Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

आरोग्य विभागात 7 हजारांहून अधिक पदभरतीची तयारी

आरोग्य विभागात पदभरती
आरोग्य विभागात पदभरती
आरोग्य विभागात 7 हजारांहून अधिक पदभरतीची तयारी

आरोग्य विभागात मोठ्या पदभरतीची तयारी; गट-क व गट-डची तब्बल 7 हजारांहून अधिक रिक्त पदे भरणार? शासनाकडे प्रस्ताव

पुणे| प्रतिनिधी:- राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र आरोग्य सेवा आयुक्तालयाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडे गट-क व गट-ड संवर्गातील मोठ्या पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. 10 जुलै 2026 रोजी पाठविलेल्या पत्रानुसार राज्यातील विविध कार्यालयांमध्ये गट-क व गट-डची हजारो पदे रिक्त असून ती भरण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे

आरोग्य विभागाने यापूर्वी सन 2023 मध्ये गट-क व गट-डच्या 10,949 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यापैकी गट-कची 6,046 आणि गट-डची 3,519 अशी एकूण 9,565 पदे भरून आरोग्य सेवेसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले. तरीही सध्या गट-कची 4,476 आणि गट-डची 2,465 अशी एकूण 6,941 पदे सरळसेवा कोट्यात रिक्त असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.  राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

याशिवाय, विभागीय कार्यालयांकडून प्राप्त माहितीनुसार गट-कची 5,307 आणि गट-डची 1,888 अशी एकूण 7,195 पदे रिक्त असल्याची माहितीही शासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ही पदे तातडीने भरण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे

दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ कंत्राटी सेवा बजावणाऱ्या 15,010 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी स्वतंत्र अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली असल्याने ही पदे नियमित भरती प्रक्रियेत समाविष्ट होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नव्याने मंजूर झालेल्या आरोग्य संस्थांसाठी 5,223 नवीन पदनिर्मितीलाही शासनाने यापूर्वी मंजुरी दिली आहे.  आरोग्य विभाग भरती 2026 | रिक्त पदांची माहिती 13 जुलैपर्यंत

नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी बिंदुनामावली अद्ययावत करून तिची मागासवर्गीय विभागामार्फत पडताळणी करण्याचे काम सुरू असल्याचे पत्रात नमूद आहे. तसेच ही भरती टीसीएस-आयओएन (TCS iON) किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राबविण्याबाबत शासनाने मार्गदर्शन करावे, अशी विनंती आरोग्य सेवा आयुक्तालयाने केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियाना कर्मचारी HR पॉलिसी

भरतीबाबत अंतिम निर्णय शासनाकडून घेतल्यानंतर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार असून त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे आरोग्य विभागातील नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महत्त्वाचे मुद्दे :
सन 2023 मध्ये 10,949 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती.
सध्या 7 हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याची माहिती.
गट-क व गट-ड पदभरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव.
टीसीएस-आयओएन किंवा एमपीएससीमार्फत भरतीची शक्यता.
अंतिम निर्णयानंतर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira