
आरोग्य सेवा आयुक्तालयाचे सर्व जिल्हा व विभागीय कार्यालयांना निर्देश; १३ जुलै २०२६ पर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश
बातमी:
पुणे : राज्यातील आरोग्य विभागातील गट-क व गट-ड संवर्गातील पदभरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांनी सर्व संबंधित विभागीय व जिल्हास्तरीय कार्यालयांना रिक्त पदांची बिंदू नामावली (Roster) आणि व्हॅकन्सी मॅट्रिक्स तयार करून प्रमाणित स्वरूपात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दिनांक ९ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, प्रस्तावित २०२६ भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे.
तसेच आरक्षणानुसार बिंदू नामावली, व्हॅकन्सी मॅट्रिक्स तसेच पेसा व नॉन-पेसा क्षेत्रानुसार माहिती तयार करून १३ जुलै २०२६ पर्यंत मागासवर्गीय कक्षाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हे पत्र उपसंचालक, सहाय्यक संचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा हिवताप अधिकारी, प्रादेशिक मनोरुग्णालय अधीक्षक तसेच इतर संबंधित आरोग्य विभागाच्या कार्यालयांना पाठविण्यात आले आहे.
या आदेशामुळे राज्यातील आरोग्य विभागातील गट-क व गट-ड पदभरती प्रक्रियेला लवकरच वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













