टाकळीभानचे विमा प्रतिनिधी अर्जुन राऊत यांचा झोनल मॅनेजर (वेस्टर्न झोन) ट्रॉफीने सन्मान
२४ वर्षांच्या विश्वासू विमा सेवेला यशाची पावती; महादेव यात्रा कमिटी, मित्र मंडळ व शेतकरी संघटनेसह ग्रामस्थांकडून अभिनंदन
टाकळीभान | शिव वार्ता प्रतिनिधी
टाकळीभान येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) विमा प्रतिनिधी अर्जुन भाऊसाहेब राऊत यांनी विमा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना झोनल मॅनेजर (वेस्टर्न झोन) ट्रॉफी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. श्रीरामपूर एलआयसी शाखेतर्फे आयोजित सन्मान सोहळ्यात शाखेचे वरिष्ठ शाखाधिकारी नामदेव कानडे आणि विकास अधिकारी किरण बागुल यांच्या हस्ते राऊत यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
अर्जुन राऊत हे गेल्या २४ वर्षांपासून एलआयसीच्या माध्यमातून ग्राहकांना सातत्याने विश्वासू व प्रामाणिकपणे विमा सेवा देत आहेत. आपल्या दीर्घ अनुभवातून आणि ग्राहकांशी जपलेल्या विश्वासपूर्ण संबंधांतून त्यांनी विमा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामुळे टाकळीभानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राऊत यांच्या या यशाबद्दल टाकळीभान येथील महादेव यात्रा कमिटी, श्री राजेंद्र कोकणे मित्र मंडळ, शेतकरी संघटना तसेच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या यशाचे कौतुक करत उपस्थितांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महादेव यात्रा कमिटी व मित्र मंडळाच्या वतीने सत्कार
यावेळी माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, प्रा. कार्लस साठे, प्रा. जयकर मगर, भैय्या पठाण, गजानन कोकणे, बाबासाहेब तनपुरे, बंडोपंत बोडखे, काकासाहेब डिके, राजेंद्र शिंदे, मधुकर गायकवाड, विष्णुपंत पटारे, मिलिंद शेळके, बाळासाहेब खुरुद आणि अरविंद साळवे उपस्थित होते.
शेतकरी संघटनेच्या वतीनेही गौरव
शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित सत्कारप्रसंगी भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल बोडखे, भाजपचे जिल्हा सचिव नारायण काळे, शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष सुजित बोडखे, देविदास नाईक, नितीन वेताळ, गणेश वखरे, केरू जाधव आणि विलास नाईक आदी उपस्थित होते.टाकळीभानमध्ये ज्ञानज्योती संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा
अर्जुन राऊत यांच्या यशामुळे टाकळीभान परिसरात आनंदाचे वातावरण असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि ग्रामस्थांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. सातत्य, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांचा विश्वास यांच्या बळावर मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.जिल्हा संघटकपदी निवड; अर्जुन राऊतांचा सन्मान












