Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

गटकळ स्कूलच्या ज्ञानदा तुवरचे स्तोत्र पठण स्पर्धेत यश

गटकळ स्कूलची विद्यार्थिनी ज्ञानदा केशव तुवर हिचे स्तोत्र पठण स्पर्धेत यश

गटकळ स्कूलच्या विद्यार्थिनीचे स्तोत्र पठण स्पर्धेत यश; ज्ञानदा तुवर हिने पटकावला तृतीय क्रमांक

टाकळीभान | शिव वार्ता प्रतिनिधी

महिला मंडळ, श्रीरामपूर यांच्या वतीने आयोजित स्तोत्र पठण स्पर्धेत टाकळीभान गटकळ स्कूलची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी ज्ञानदा केशव तुवर हिने तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल तिला रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक संस्कार रुजविणे, स्तोत्र पठणाची आवड निर्माण करणे,उच्चारांतील स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढविणे या उद्देशाने महिला मंडळाच्या वतीने शालेय व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ज्ञानदा तुवर हिने सुमधुर व प्रभावी स्तोत्र पठणातून उपस्थितांची मने जिंकली. तिच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

ज्ञानदा हिने मिळविलेल्या यशामुळे गटकळ स्कूलच्या शैक्षणिक व सांस्कृतिक यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशाबद्दल गटकळ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ॲड. भाऊसाहेब टेमक, ॲड. सुरेखा टेमक, प्राचार्या भारती कुदळे तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी तिचे अभिनंदन केले.भविष्यातही तिने शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अशीच प्रगती करावी,अशा शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सुरेखा टेमक यांनी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असून, व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळत आहे.

ज्ञानदा केशव तुवर हिच्या यशाबद्दल शाळा, शिक्षक, पालक आणि परिसरातून तिचे कौतुक होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

परीक्षा फी भरली नाही तर परीक्षेला बसू देणार नाही;असा दम शिक्षक देतात  


 

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!