
शिव वार्ता | विशेष प्रतिनिधी :-NHM कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियुक्ती मिळाल्यास किती मिळेल वेतन? सातव्या वेतन आयोगानुसार ‘शिव वार्ता’चा अंदाज
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे.जर शासनाकडून नियमित नियुक्ती मिळाली, तर सातव्या वेतन आयोगानुसार किती वेतन मिळू शकते
याबाबत अद्याप कोणताही अधिकृत नियुक्ती आदेश जारी झालेला नसला, तरी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपलब्ध भरती जाहिरातींमध्ये नमूद करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीच्या आधारे संबंधित पदांना मिळू शकणाऱ्या अंदाजे मूलभूत वेतनाची माहिती शिव वार्ता आपल्या वाचकांसाठी सादर करत आहे.
नियुक्ती मिळाल्यास वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता. १३ जुलै २०२६ पर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश
सध्या अनेक NHM कर्मचारी मानधनावर कार्यरत आहेत. भविष्यात शासनाची नियमित नियुक्ती मिळाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना मूलभूत वेतनासोबत महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA), वार्षिक वेतनवाढ तसेच शासनाच्या नियमानुसार इतर सेवा लाभ मिळू शकतात. त्यामुळे सध्याच्या मानधनाच्या तुलनेत मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरोग्य क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाल्यास त्यांच्या आर्थिक स्थैर्यात मोठा बदल होऊ शकतो, अशी भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाची सूचना: खाली दिलेली वेतनश्रेणी ही उपलब्ध वेतनस्तर (Pay Matrix) नुसार केलेला अंदाज असून, अंतिम वेतन शासनाच्या अधिकृत आदेशानुसारच निश्चित होईल.
संभाव्य वेतनश्रेणी (अंदाज)खालील प्रमाणे
पद :- वेतन स्तर
संभाव्य वेतनश्रेणी
बायोमेडिकल इंजिनिअर
S-15
₹41,800 – ₹1,32,300
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/बायोमेडिकल)
S-14
₹38,600 – ₹1,22,800
वैद्यकीय समाजसेवक
S-14
₹38,600 – ₹1,22,800
सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी
S-14
₹38,600 – ₹1,22,800
स्टाफ नर्स (GNM)
S-13
₹35,400 – ₹1,12,400
डेंटल हायजिनिस्ट
S-13
₹35,400 – ₹1,12,400
ECG तंत्रज्ञ
S-13
₹35,400 – ₹1,12,400
डायलिसिस तंत्रज्ञ
S-13
₹35,400 – ₹1,12,400
ANM
S-8
₹25,500 – ₹81,100
आरोग्य सहाय्यक (महिला)
S-10
₹29,200 – ₹92,300
बायोमेडिकल इंजिनिअर सहाय्यक
S-8
₹25,500 – ₹81,100
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी
S-8
₹25,500 – ₹81,100
सहाय्यक ग्रंथपाल
S-7
₹29,700 – ₹69,100
शस्त्रक्रियागृह सहाय्यक
S-7
₹29,700 – ₹69,100
वायरमन
S-6
₹19,900 – ₹63,200
लिपिक-टंकलेखक
S-6
₹19,900 – ₹63,200
लेखा लिपिक
S-6
₹19,900 – ₹63,200
उद्यान सहाय्यक
S-6
₹19,900 – ₹63,200
शवविच्छेदन मदतनीस
S-1
₹15,000 – ₹47,600
आया
S-1
₹15,000 – ₹47,600
वॉर्डबॉय
S-1
₹15,000 – ₹47,600
नियुक्ती मिळाल्यास वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता.राष्ट्रीय आरोग्य अभियाना कर्मचारी HR पॉलिसी
सध्या अनेक NHM कर्मचारी मानधनावर कार्यरत आहेत. भविष्यात शासनाची नियमित नियुक्ती मिळाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना मूलभूत वेतनासोबत महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA), वार्षिक वेतनवाढ तसेच शासनाच्या नियमानुसार इतर सेवा लाभ मिळू शकतात. त्यामुळे सध्याच्या मानधनाच्या तुलनेत मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
टीप :
या वृत्तातील वेतनश्रेणी ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपलब्ध भरती जाहिरातींमध्ये नमूद केलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या पे-लेव्हलच्या आधारे तयार केलेला अंदाज आहे. शासनाकडून नियमित नियुक्तीचा अधिकृत आदेश जाहीर झाल्यानंतरच अंतिम वेतन, वेतनस्तर आणि सेवा अटी निश्चित होतील.
— टीम शिव वार्ता














