Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

टाकळीभान येथे सर्वरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

टाकळीभान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू

 

टाकळीभान येथे सर्वरोग निदान शिबिराला मोठा प्रतिसाद

टाकळीभान येथे सर्वरोग निदान शिबिराला मोठा प्रतिसाद; ३७५ नागरिकांनी घेतला लाभ

टाकळीभान | प्रतिनिधी :- दिलीप लोखंडे

टाकळीभान येथे सर्वरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रवरा मेडिकल ट्रस्ट,व माजी सभापती नानासाहेब पवार प्रतिष्ठान, टाकळीभान विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि टाकळीभान ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, १९ जुलै रोजी टाकळीभान येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आरोग्य शिबिराचा तब्बल ३७५ नागरिकांनी लाभ घेतला.

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अशोक कारखान्याचे माजी संचालक भाऊ थोरात, माजी सरपंच चित्रसेन रणनवरे, रमेश दादा धुमाळ, उपसरपंच कान्हा खंडागळे, टाकळीभान सोसायटीचे चेअरमन राहुल पटारे, माजी चेअरमन एकनाथ पटारे, युवानेते भाऊसाहेब पवार, सुधीर मगर, भाजपाचे नारायण काळे, मुकुंद हापसे, अक्षय कोकणे, तसेच अनिल दाभाडे, संजय पवार, नानासाहेब लेलकर, विलास सपकाळ, बाळासाहेब शेळके आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम बोरुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आरोग्य विभागात 7 हजारांहून अधिक पदभरतीची तयारी

शिबिरामध्ये विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची मोफत तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले. याशिवाय पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड काढून देण्याची सुविधाही शिबिरस्थळी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी!

या आरोग्य शिबिरासाठी राज्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

shivvarta-jahira

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सुरेश जगदाळे (अधीक्षक), डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी येथील प्रशासकीय अधिकारी विलास घुले, मेडिकल सोशल वर्कर जोसेफ मकासरे, तसेच डॉ. राहुल सिद्धेय, डॉ. स्वप्नील हंबड, डॉ. शार्दुल गवांडे आणि डॉ. समृद्धी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर आरोग्य जनजागृतीसह सामाजिक बांधिलकी जपणारे ठरले.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira