Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

श्रीरामपूरमध्ये कर्णकर्कश साउंड सिस्टीम;दोघांवर गुन्हा,

श्रीरामपूरमध्ये गणेश आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साउंड सिस्टीम; दोघांवर गुन्हा, साउंड सिस्टीम जप्त

पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष; साउंड सिस्टीम मालकाला १५ हजार रुपयांचा दंड

शिव वार्ता प्रतिनिधी बापूसाहेब नवले

श्रीरामपूर : गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान कर्णकर्कश आवाजात साउंड सिस्टीम वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संबंधित साउंड सिस्टीम जप्त केली असून, साउंड सिस्टीमच्या मालकाला १५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक ३, बालिका विद्यालयाजवळील शिवसर्कल चौक परिसरात ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत गणेश आगमन मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम वाजवण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवराजे युवा मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या गणेश आगमन मिरवणुकीत साउंड सिस्टीमचा कर्णकर्कश आवाज सुरू होता. मिरवणुकीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांनी साउंड सिस्टीमचा आवाज कमी करण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या. मात्र, संबंधितांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम सुरू ठेवल्याचे कारवाईत नमूद करण्यात आले आहे.

टाटा एसवर साउंड सिस्टीम लावून मोठ्या आवाजात गाणी

संबंधितांनी टाटा एस ट्रक क्रमांक MH 46 AF 6580 वर साउंड सिस्टीम लावून कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवली. त्यामुळे परिसरात ध्वनी प्रदूषण होऊन सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी शिवराजे युवा मित्र मंडळाचे अल्पवयीन अध्यक्ष अ.ब.क. तसेच शिवबाजा साउंड सिस्टीमचे मालक निलेश दादू पाटील यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विविध कलमांनुसार गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223, 270, 292 तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलम 182 A/19(4) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

साउंड सिस्टीम जप्त; १५ हजारांचा दंड

पोलिसांनी कारवाई करत संबंधित साउंड सिस्टीम जप्त केली. तसेच एम.आर.टी.ओ. श्रीरामपूर यांच्या माध्यमातून साउंड सिस्टीमच्या मालकाला १५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलिस निरीक्षक विशाल चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली API रामचंद्र शिखरे, PSI अप्पासाहेब हंडाळ, सफौ. दिपक कदम, पोको. मच्छिंद्र कातखडे, पोको. अजित पटारे, पोको. पंकज सानप, पोको. ज्ञानेश्वर वाघमोडे यांनी कारवाई केली.

दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोको. पांडुरंग चौधरी करीत आहेत.

श्रीरामपूरमध्ये बेकायदेशीर भंगार दुकानांवर मोठी कारवाई;

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!