Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

नर्सिंग भरती नियमावर फेरविचाराची मागणी

नर्सिंग विद्यार्थ्यांच्या भरती नियमावर फेरविचाराची मागणी;

नर्सिंग विद्यार्थ्यांच्या 80:20 भरती नियमावर फेरविचाराची मागणी; राज्यपाल, मुख्यमंत्री यांना निवेदन

मुंबई / प्रतिनिधी :

नर्सिंग विद्यार्थ्यांच्या 80:20 भरती नियमावर फेरविचाराची मागणी नर्सिंग स्टुडंट्स वेलफेअर फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांनी अधिपरिचारिका (स्टाफ नर्स) सेवा प्रवेश नियम, २०२५ मधील स्त्री-पुरुष भरतीचे 80:20 प्रमाण रद्द करून गुणवत्ताधारित (Merit Based) व Gender Neutral भरती धोरण लागू करावे, अशी मागणी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित विभागांकडे निवेदनाद्वारे केली आहे. NHM अधिसंख्य पदांचा प्रस्ताव महिन्यात सादर करण्याचे आदेश
फाउंडेशनने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, नर्सिंग व्यवसाय हा कौशल्य, ज्ञान आणि व्यावसायिक पात्रतेवर आधारित असून भरती प्रक्रियेत लिंगाऐवजी गुणवत्ता आणि गुणवत्ता यादीला प्राधान्य दिले पाहिजे. संविधानातील समानतेच्या तत्त्वानुसार सर्व उमेदवारांना समान संधी मिळणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.NHM कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशना बाबत हालचालींना वेग
हे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, महाराष्ट्र परिचर्या परिषद तसेच भारतीय परिचर्या परिषद (INC) यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना शासनाची नियुक्ती मिळाल्यास किती वेतन मिळेल
shivvarta-jahira
शिव वार्ता या विषयावरील पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून वाचकांपर्यंत अद्ययावत माहिती पोहोचवत राहील.
Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira