टाकळीभान येथे शेतकरी लोकनेते अजित दादा काळे यांचा जाहीर सत्कार
शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजन; विविध पदाधिकारी, शेतकरी नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती
शिव वार्ता क्रीडा प्रतिनिधी
टाकळीभान येथील शेतकरी संघटनेच्या वतीने माननीय शेतकरी लोकनेते अजित दादा काळे साहेब, राज्य उपाध्यक्ष व कायदे तज्ज्ञ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. शेतकरी प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या काळे यांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रभारी व प्रवक्ते प्रा. कार्लस साठे, श्रीरामपूर युवा तालुकाध्यक्ष शरद भाऊ असने, युवा शेतकरी नेते सचिन भाऊ वेताळ, भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ बोडखे, बापूसाहेब गोरे पाटील, बाबासाहेब वेताळ, नेवासा तालुका अध्यक्ष मेजर अशोक काळे, खंडेराव सरोदे, बेलपिंपळगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार बंडोपंत चौगुले, अरविंद भाऊ साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच टाकळीभान शाखाध्यक्ष सुजित भाऊ बोडखे, भाऊसाहेब गव्हाणे, राज्य क्रीडा अध्यक्ष, नेवासा तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागवडे, दत्तू पाटील निकम, गोरक्षनाथ वेताळ, श्याम गजभिव, भाऊसाहेब पटारे, अक्षय कोकणे, श्रीकृष्ण वेताळ, बाबासाहेब वेताळ, रणजीत मगर, पवन भाऊ मगर, मच्छिंद्र पटारे, विलास नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. शेतीमालाला योग्य भाव, सिंचन, वीज, शेतकरी हिताच्या योजना तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याची गरज यावर भर देण्यात आला.
शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासन आणि शासनाच्या स्तरावर मांडण्यासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित शेतकरी बांधवांनीही आपल्या विविध समस्या व अपेक्षा मांडल्या.
कार्यक्रमाला समारोप “जय जवान, जय किसान, जय शेतकरी संघटना” या घोषणेने करण्यात आला.













