Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

अग्निवीर भरतीच्या तयारीतील खेळाडूंना स्पोर्ट्स शूजचे वाटप

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या खेळाडूंना शूज

अग्निवीर भरतीच्या तयारीतील खेळाडूंना ११ जोड्या स्पोर्ट्स शूजचे वाटप

संकल्प अभिनव भारत फाउंडेशन पुणे यांच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; मान्यवरांचा सत्कार

शिव वार्ता प्रतिनिधी 

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या खेळाडू व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संकल्प अभिनव भारत फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने ११ जोड्या रनिंग स्पोर्ट्स शूजचे वाटप करण्यात आले. अग्निवीर प्रशिक्षक सागर कणसे सर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या खेळाडूंना शूज1

अग्निवीर भरतीसाठी शारीरिक तयारी करताना धावण्याला विशेष महत्त्व आहे. ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील अनेक युवक आर्थिक अडचणींमुळे आवश्यक दर्जाचे स्पोर्ट्स शूज घेऊ शकत नाहीत. अशा खेळाडूंना मदतीचा हात देत त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ बोडखे, शेतकरी संघटनेचे प्रभारी व प्रवक्ते प्रा. कार्लस साठे सर, राष्ट्र सह्याद्रीचे पत्रकार अर्जुन भाऊ राऊत, विश्व धावपटू भाऊसाहेब गव्हाणे तसेच अग्निवीर प्रशिक्षक सागर कणसे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अग्निवीर तयारी करणाऱ्या खेळाडूंना शूज वाटप

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अग्निवीर प्रशिक्षक सागर कणसे सर तसेच इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. खेळाडू आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपस्थित मान्यवरांनी मेहनत, सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्धात्मक परीक्षांसह शारीरिक चाचण्यांमध्ये यश मिळविण्याचे आवाहन केले.

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत असून, आर्थिक परिस्थितीमुळे तयारीत अडथळे येणाऱ्या खेळाडूंना यामुळे मोठा आधार मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला अग्निवीर भरतीची तयारी करणारे अनेक खेळाडू व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी संकल्प अभिनव भारत फाउंडेशन आणि प्रशिक्षक सागर कणसे सर यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. युवकांच्या क्रीडा व भरतीपूर्व तयारीला प्रोत्साहन देणारे असे उपक्रम भविष्यातही सुरू राहावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

टाकळीभान ग्रामसभा अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून प्रश्नांची उत्तरे द्यावीत – अनिल बोडखे

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!