Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

बीड मधील अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका,

श्रीरामपूर पोलिसांची मोठी कारवाई

श्रीरामपूर पोलिसांची मोठी कारवाई

श्रीरामपूर पोलिसांची मोठी कारवाई; बीडमधील अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका, अपहरणकर्ता ताब्यात | शिव वार्ता

श्रीरामपूर | प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला श्रीरामपूर येथे आणल्याची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलीची सुखरूप सुटका केली.

या प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जुलै 2026 रोजी नेकनूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तपासाच्या कामानिमित्त श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आले होते.

त्यावेळी दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना दिली. अपहरण करणारा श्रीरामपूर परिसरात असल्याचा संशय व्यक्त करत मुलीचे छायाचित्र पोलिसांकडे देण्यात आले.होते

या माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. केवळ उपलब्ध छायाचित्राच्या आधारे संजयनगर, वॉर्ड क्रमांक 1, श्रीरामपूर येथून अल्पवयीन मुलीचा शोध घेत तिची सुखरूप सुटका करण्यात आली.

या कारवाईदरम्यान अपहरणप्रकरणातील आरोपी शुभम नामदेव मिसाळ वय 22, रा. आगर कानडगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर याला त्याच्या दोन नातेवाईकांसह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी नेकनूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम तसेच मच्छिंद्र कातखडे, संपत बडे, अमोल पडोळे, अजित पटारे, अमोल गायकवाड, ज्ञानेश्वर वाघमोडे, सचिन दुकळे, सागर बनसोडे, रविंद्र शिंदे तसेच नेकनूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व्ही. ए. क्षीरसागर आणि एच. एम. कदम यांनी सहभाग घेतला.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira