Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

घाडगे पाटील यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

त्रिमूर्ती विद्यालय, घोगरगाव येथे साहेबराव घाडगे पाटील यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

त्रिमूर्ती विद्यालय, घोगरगाव येथे साहेबराव घाडगे पाटील यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

त्रिमूर्ती विद्यालय, घोगरगाव येथे साहेबराव घाडगे पाटील यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

टाकळीभान | प्रतिनिधी
घोगरगाव येथील त्रिमूर्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थापक स्वर्गीय साहेबराव घाडगे पाटील यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

सोमवार (दि. १३) रोजी झालेल्या या कार्यक्रमात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामराव बहिरट, प्रा. संतोष जावळे, विजय देवळालकर, दिलीप लोखंडे, अशोक रणनवरे, संदीप बोडखे, बापूसाहेब नवले, नुकतेच पोलीस भरती झालेल्या विठ्ठल ढवळे, आण्णासाहेब पटारे, महेंद्र शेळके व प्रशांत बहिरट आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बापूसाहेब नवले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, घोगरगावसारख्या ग्रामीण भागात स्व. साहेबराव घाडगे पाटील यांनी त्रिमूर्ती विद्यालयाची स्थापना करून विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची भक्कम पायाभरणी केली.आज श्रीरामपूर, नेवासा तसेच इतर तालुक्यांतील विद्यार्थीही या विद्यालयात शिक्षण घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

नुकतेच पोलीस दलात भरती झालेले विठ्ठल ढवळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “जिद्द, चिकाटी, सातत्य आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते,” असा प्रेरणादायी संदेश दिला. तसेच त्यांनी विद्यालयाला दहा पुस्तके भेट देण्याची घोषणा केली.

 

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्व. साहेबराव घाडगे पाटील यांना ही अनोखी आदरांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र डिके व रेखा दिवे यांनी केले. अर्चना जगताप यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. संतोष जावळे व नितीन साळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira