Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

टाकळीभान मध्ये अजितदादा पवार जयंती निमित्त वृक्षारोपण

टाकळीभान येथील महादेव मंदिर परिसरात अजितदादा पवार जयंतीनिमित्त आयोजित वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थी-खेळाडू सत्कार कार्यक्रम.

टाकळीभानमध्ये अजितदादा पवार जयंतीनिमित्त वृक्षारोपण; गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा गौरव

टाकळीभान | प्रतिनिधी : बापूसाहेब नवले

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा आणि निसर्ग सामाजिक पर्यावरण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.  राज्यस्तरीय कबड्डी पुरस्काराने प्राचार्य सोपानराव काळे यांचा गौरव
या कार्यक्रमात किसान सभा उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोकणे, शेतकरी संघटनेचे प्रवक्ते कार्लस साठे, अर्जुन राऊत आणि श्रीधर गाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश उपस्थितांनी दिला.
याच कार्यक्रमात विभागीय कबड्डीपटू गणेश ब्राह्मणे तसेच तिरंदाजी स्पर्धेत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावणारे मयूर दिलीप लोखंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
shivvarta-jahira
या कार्यक्रमाला अनिल बोडखे, दत्तू मगर, बबनराव मगर, काकासाहेब डिके, देविदास कोकणे, धनराज कोकणे, रेवनाथ कोकणे, गजानन कोकणे, बंडू पंत कोकणे, अनिल कोकणे, भाऊराव कोकणे, सुजित बोडखे, अरविंद साळवे, विष्णुपंत पटारे, अमोल पटारे, सुरेश पवार, राजेंद्र रणनवरे, पवन मगर, रणजीत मगर, पत्रकार संदीप बोडखे, दिलीप लोखंडे, अशोक रणवरे, मधुकर गायकवाड, गोवर्धन पटारे, बाळासाहेब थोरात, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब पटारे, भाऊसाहेब गव्हाणे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, गुणवंतांचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira