
इगतपुरी | प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील मूळ रहिवासी तथा हल्ली मुक्काम उल्हासनगर येथील भिऊबाई बबन जगताप यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी शनिवार, १२ जुलै २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने नांदगाव सदो गावासह नातेवाईक व मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, जावई, नातवंडे तसेच मोठा परिवार आहे.
स्वर्गीय भिऊबाई बबन जगताप यांच्या स्मरणार्थ रविवार, १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता बौद्ध संस्कार पद्धतीने पुण्यानुमोदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम ‘सोहम मॅरेज हॉल‘- सत्यमाता अपार्टमेंट, निरंकारी भवनासमोर, गोल मैदान, उल्हासनगर – ४२१००२ येथे संपन्न होणार असून, नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जगताप परिवाराने केले आहे.













