Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

कै. हरिश्चंद्र गोपीनाथ शिंदे यांचे दुःखद निधन; घुमनदेव गावावर शोककळा

कै. हरिश्चंद्र गोपीनाथ शिंदे यांचे दुःखद निधन

शांत, मनमिळाऊ स्वभावाच्या व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने घुमनदेव गावावर शोककळा

शिव वार्ता | प्रतिनिधी

घुमनदेव येथील कै. हरिश्चंद्र गोपीनाथ शिंदे यांचे रात्री १०.४५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने घुमनदेव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एक शांत, मनमिळाऊ आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

कै. हरिश्चंद्र शिंदे हे अत्यंत शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही कुणाशी रागाने न बोलता सर्वांशी आपुलकीने आणि प्रेमाने वागण्याची भूमिका जपली. त्यामुळे गावातील सर्वच स्तरातील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांना आप्तेष्टांसह ग्रामस्थांमध्ये विशेष मानाचे स्थान होते.

त्यांच्या निधनाने घुमनदेव भजनी मंडळाचे सदस्य रवींद्र शिंदे यांनी आपल्या वडिलांना गमावले असून, शिंदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, एक बहीण, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

कै. हरिश्चंद्र शिंदे यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमधून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या प्रेमळ आठवणी सदैव स्मरणात राहतील.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!