Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

जिल्हा संघटकपदी निवड; अर्जुन राऊतांचा सन्मान

अर्जुन राऊत यांचा सत्कार; जिल्हा संघटकपदी निवडीबद्दल अभिनंदन

टाकळीभान (प्रतिनिधी) : श्री अर्जुन पा. राऊत यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या जिल्हा संघटकपदी निवड झाल्याबद्दल श्री राजेंद्र पा. कोकणे मित्र मंडळ व महादेव यात्रा कमिटी यांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री राऊत यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी सामाजिक कार्यासह पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीच्या उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

सत्कार प्रसंगी श्रीधर गाडे, प्रा. कार्लस साठे सर, गजानन कोकणे, ॲड. रत्नाकर रणनवरे, भैया पठाण, आप्पासाहेब वाघुले, जितेंद्र छल्लारे, रावसाहेब आहेर, बापूसाहेब शिंदे, सुरेश पवार, काकासाहेब डिके, मधुकर गायकवाड, गोवर्धन पटारे, रावसाहेब गायकवाड, नवनाथ पवार, सोमनाथ पवार, ज्ञानेश्वर वखरे, राजेंद्र रणनवरे यांच्यासह गावातील पदाधिकारी, महादेव यात्रा कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira