Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

ऋषी छल्लारे फाउंडेशन विद्यार्थि चा सत्कार

ऋषी छल्लारे फाउंडेशन विद्यार्थि चा सत्कार

छल्लारे फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

गुणवंत विद्यार्थिनीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

भोकर (प्रतिनिधी): लोकनेते माजी आमदार भानुदासजी मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषी छल्लारे फाउंडेशन, भोकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली.या कार्यक्रमाला अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक नीरज भैय्या मुरकुटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कारखान्याचे नूतन व्हाइस चेअरमन आदिनाथ पाटील झुराळे आणि बी.टेक. (आयटी) पदवी संपादन करून अभियंता झालेल्या हर्षदा बनीचंद अहिरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ऋषी छल्लारे फाउंडेशनच्या सामाजिक, शैक्षणिक व समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी फाउंडेशनचे प्रतिनिधी गणेश छल्लारे यांनी समाजहित, शिक्षण आणि गरजू घटकांच्या सेवेसाठी फाउंडेशनचे कार्य भविष्यातही अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.

या उपक्रमास परिसरातील नागरिक, पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira