जलसंपदा विभागाचा ‘उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार’ मिळाल्याबद्दल बाळासाहेब कोकणे यांचा सत्कार
टाकळीभान | शिव वार्ता प्रतिनिधी
जलसंपदा विभाग, अहिल्यानगर यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा ‘उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार’ टाकळीभान येथील बाळासाहेब कोकणे यांना मिळाल्याबद्दल टाकळीभान ग्रामस्थ व मित्रमंडळींच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
जलसंपदा विभागातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत बाळासाहेब कोकणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याची शासनस्तरावर दखल घेत गौरव झाल्याने टाकळीभान परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सन्मानाबद्दल मित्रमंडळी व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत लांडगे, मधुमामा गायकवाड, गोवर्धन पटारे, विष्णुपंत पटारे, कृष्णा वेताळ, काका डी.के., भाऊराव कोकणे, अर्जुन राऊत आदी मित्रमंडळी उपस्थित होती. उपस्थितांनी बाळासाहेब कोकणे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बाळासाहेब कोकणे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या प्रामाणिक व उल्लेखनीय कार्याची पावती असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशामुळे टाकळीभानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला, अशी भावना ग्रामस्थ व मित्रमंडळींनी व्यक्त केली.
शिव वार्ता बापूसाहेब नवले













