Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

संघर्ष समितीचा मुंबईत भव्य महामोर्चा

इगतपुरी | प्रतिनिधी:-अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात ३० जून रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना बौद्ध महासभेचे तालुका कमिटी प्रमुख विक्रम जगताप यांनी सांगितले की, अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणामुळे समाजात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असून, या निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्यभरातील आंबेडकरी विचारांचे अनुयायी, बौद्ध समाज आणि विविध सामाजिक संघटना एकत्र येणार आहेत.
या महामोर्चाचे नेतृत्व आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती (महाराष्ट्र), रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे डॉ. भीमराव आंबेडकर, माजी सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले, माजी सामाजिक न्यायमंत्री व भाजप नेते बबनराव घोलप तसेच माजी आमदार बाबुराव माने करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इगतपुरी तालुक्यातील बौद्ध समाजातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने या महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी विक्रम जगताप, विठ्ठल जगताप, किशोर भडांगे, गजेंद्र बर्वे, नगरसेविका माला गवळी, आशा भडांगे, नगरसेवक अतिष मनोहर, नंदू गवळी, तिरेश गरुड, शुभम गांगुर्डे, आनंद देहाडे, अमोल जगताप, आकाश गवळी, मनोज मोरे, गिरीश वानखेडे, अनिकेत उबाळे, महेशा पगारे, भीमराव गांगुर्डे, प्रभाकर चिकणे, राहुल शिंदे, भैया बर्वे, विश्वनाथ जगताप आदी उपस्थित होते.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira