Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

अनिल कोळसे पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी

अनिल कोळसे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

अनिल कोळसे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर नगर (अहिल्यानगर) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई | प्रतिनिधी :  अनिल कोळसे पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या राज्यातील अग्रगण्य पत्रकार संघटनेच्या उत्तर नगर (अहिल्यानगर) जिल्हाध्यक्ष या महत्त्वपूर्ण पदावर ज्येष्ठ पत्रकार अनिल कोळसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी व राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली.

गेली २० ते २२ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले अनिल कोळसे हे निर्भीड, परखड आणि सामाजिक भान जपणारे पत्रकार म्हणून ओळखले जातात. विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने प्रभावीपणे आवाज उठवत पत्रकारितेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे.

अनिल कोळसे हे ‘सार्वमंथन’ या दैनिकाचे संपादक असून, त्यांची शासकीय मान्यताप्राप्त स्वराज प्रिंटिंग प्रेस देखील कार्यरत आहे. पत्रकारिता, प्रकाशन आणि व्यवस्थापन या तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पत्रकारांसह सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने त्यांच्यावर उत्तर नगर (अहिल्यानगर) जिल्ह्याची धुरा सोपवली आहे. संघटनेच्या ध्येय-धोरणांच्या अधीन राहून जिल्ह्यात संघटना अधिक सक्षम व व्यापक करण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

अनिल कोळसे यांच्या नियुक्तीचे पत्रकार, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत असून, पत्रकारितेच्या क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, उत्तर नगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अनिल कोळसे यांनी दिली आहे.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira