Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

राष्ट्रपुरुषांवरील आक्षेपार्ह पोस्ट; आरोपी 12 तासात अटकेत

राष्ट्रपुरुष, आक्षेपार्ह पोस्ट,

 राष्ट्रपुरुष, आक्षेपार्ह पोस्ट,

वैयक्तिक वादातून राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; आरोपीला 12 तासांत अटक

पाथर्डी | प्रतिनिधी
पाथर्डी येथे सोशल मीडियावर राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांना पोलिसांनी कडक इशारा दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जुलै 2026 रोजी फेसबुकवर राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट व्हायरल झाली होती. यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 826/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 353(2) नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग, सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर आणि पाथर्डी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने युद्धपातळीवर सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे सुरज बाबासाहेब वांढेकर (वय 36 वर्षे) याने ही पोस्ट केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याचा देविदास शिरसाठ यांच्याशी वैयक्तिक वाद असल्याचे समोर आले. या वादातून देविदास शिरसाठ यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने आरोपीने त्यांच्या फेसबुक खात्याचा अनधिकृत प्रवेश (Access) मिळवून 26 जून 2026 रोजी त्यांच्या अकाउंटवरून महापुरुषांची बदनामी करणारा संदेश पोस्ट केल्याची कबुली दिली.
या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira