आकारपीडित शेतकऱ्यांचा लढा जिंकून दिल्याबद्दल अजित काळे यांचा टाकळीभानमध्ये भव्य सत्कार
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा गौरव; शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
टाकळीभान | शिव वार्ता प्रतिनिधी
आकारपीडित शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवत त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे शेतकरी लोकनेते ॲड.अजित काळे, राज्य उपाध्यक्ष, शेतकरी संघटना यांचा टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.आकारपीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.
आकारपीडित शेतकरी संघटना टाकळीभान,शेतकरी संघटना तसेच राजेंद्र कोकणे पाटील मित्र मंडळाच्या पुढाकाराने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच टाकळीभान परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ॲड. अजितदादा काळे यांनी आकारपीडित शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह परिसरातील विविध शेतकरी प्रश्नांवर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देण्याची गरज असून, कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी भूमिका उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास राजेंद्र कोकणे पाटील, किसान सभा जिल्हाध्यक्ष तथा प्रभारी व प्रवक्ते कार्लस साठे सर, युवा तालुका अध्यक्ष शरद असने,जिल्हा संघटक भास्करराव तुवर, संपर्कप्रमुख साहेबराव चोरमळ, जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष अनिल बोडखे, खिर्डीचे सरपंच प्रभाकर कांबळे, युवा अध्यक्ष डॉ. रोहित कुलकर्णी, बेलपिंपळगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार बंडोपंत चौगुले, देविदास नाईक, नितीन वेताळ, सुजित बोडखे, सोपानराव नाईक, बाबासाहेब वेताळ, बापूसाहेब गोरे, सागर गिरै, सतीश नाईक, सोपानराव येळे, शिवाजीराजे पटारे, काकासाहेब डिके, जयकर मगर, दिलीप कोकणे, गजानन कोकणे, मधुकर गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत लांडगे, रामेश्वर आरगडे, संदीप बोडखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी छगन नाईक, रामभाऊ नाईक, दत्तात्रय नाईक, कैलास नाईक, सोमनाथ नाईक, विष्णुपंत खंडागळे, गौरव वेताळ, दिलीप वेताळ, कृष्ण वेताळ,संतोष बोडखे, शेरकर काका, खंडेराव सरोदे, बाळा कोकणे, संदीप भाऊ उघडे, सुरेश पटारे, दिगंबर मगर, रणजीत मगर, विलास बोडखे, पांडू मगर, अरविंद साळवे, पांडुरंग थोरात, सतीश कोकणे, अक्षय कोकणे, प्रल्हाद कापसे, बंडू कोकणे, विष्णुपंत पटारे, अभिमन्यू मगर, डॉ. आदिक, डॉ. नवले, विठोबा पवार, लहानुभाऊ नाईक, रेवनात कोकणे, सुनील नाईक, भाऊसाहेब बोडखे, गोरख बनकर, बन्या बापू पवार, बंडोपंत पवार, बाबासाहेब बोडखे, अमृत बोडखे, श्रीरामपूर किसान सभा उपाध्यक्ष बंडू बोडखे, बाळासाहेब सावंत, केरू जाधव, अमोल गुळवे, जालिंदर वेताळ, बंडोपंत वेताळ, प्रकाश वेताळ, ऋषिकेश वेताळ, निलेश वेताळ, विलास नाईक, बबन नाईक, श्याम गजभिव, अमोल नाईक, भाऊसाहेब गव्हाणे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टाकळीभान परिसरातील शेतकरी प्रश्नांसाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून यापुढेही सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एकजुटीने लढा देण्याची गरज असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून योग्य ती कार्यवाही करावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या सत्कार सोहळ्यास परिसरातील पत्रकार बांधवांसह टाकळीभान ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली.
“जय जवान, जय किसान, जय शेतकरी संघटना!” या घोषणेने कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला.हरेगावच्या खंडकरी शेतकऱ्यांच्या लढ्याला यश;ॲड.अजित काळे













