Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

श्रीरामपूरमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ३.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

खानापूर–वडाळा महादेव मार्गावर सापळा; विना नंबरच्या टाटा पिकअपसह २ ब्रास वाळू जप्त, चालक व मालकाविरुद्ध गुन्हा

श्रीरामपूर | शिव वार्ता प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर ते वडाळा महादेव जाणाऱ्या रस्त्यावर, मुठेवाडगाव शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई केली. अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर कार्यालयाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत विना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या ईंटा पिकअप वाहनासह २ ब्रास वाळू असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना २ ऑक्टोबर २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, खानापूर ते वडाळा महादेव जाणाऱ्या रस्त्यावरील मुठेवाडगाव शिवारात काही व्यक्ती टाटा कंपनीच्या ईंटा पिकअपमधून अवैधरीत्या वाळू वाहतूक करीत आहेत.
या माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश पोलीस पथकाला देण्यात आले. त्यानुसार पोलीस पथकाने खासगी वाहनाने घटनास्थळी जाऊन खानापूर ते वडाळा जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला सापळा रचला.
विना नंबरच्या पिकअपमधून वाळू वाहतूक
पोलिसांच्या पथकाला बातमीत नमूद केल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाची, विना नंबरची टाटा कंपनीची ईंटा पिकअप खानापूरच्या दिशेने येताना दिसली. पोलिसांनी वाहनचालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला. चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबविले.
चौकशीदरम्यान चालकाने आपले नाव साहेबराव मारुती गायकवाड (वय २४, रा. खानापूर, ता. श्रीरामपूर) असे सांगितले. वाहनाच्या हौद्यात काय आहे, अशी विचारणा केली असता त्यामध्ये वाळू भरलेली असल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी वाळू वाहतुकीचा परवाना व मालकीबाबत कागदपत्रांची विचारणा केली असता, वाळू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे समोर आले. वाहन मालक म्हणून सुनिल देवकर, रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर यांचे नाव सांगण्यात आले.
३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
या कारवाईत पोलिसांनी विना नंबरची पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीची ईंटा पिकअप आणि २ ब्रास वाळू असा एकूण ३ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त केला.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मुंमका सुदर्शन (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर जयदत्त भवर, तसेच पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोहेकॉ. सचिन धनाड, अनिल शेंगाळे, रमेश्वर वेताळ, संतोष दरेकर आणि पो.कॉ. अक्षय भोसले यांनी सहभाग घेतला.
अवैध वाळू उपशावर आणि वाहतुकीवर पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याने वाळू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.श्रीरामपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू तस्करीवर धडाकेबाज कारवाई
Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!