धन-दौलतीपेक्षा माणुसकीच शेवटी कामी येते : अविनाश गलांडे
ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; २५० सेवार्थींना प्रमाणपत्रांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
टाकळीभान | शिव वार्ता प्रतिनिधी
“आयुष्यातून जाताना आपल्या सोबत धन-दौलत येत नाही. शेवटी माणुसकीच कामी येते. छत्रपती शिवरायांनी आपल्या गुरूंच्या उपदेशाने यशस्वी मार्गक्रमण करत इतिहास घडविला. जीवनामध्ये आपल्याला सद्मार्ग दाखविण्यासाठी सद्गुरूशिवाय पर्याय नाही,” असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी केले.
ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था, टाकळीभान यांच्या वतीने आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात सेवा करणाऱ्या सेवार्थींना प्रमाणपत्र वितरण तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश गलांडे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देहू संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे होते. यावेळी माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, पुणे येथील संत साहित्य अभ्यासक दत्तात्रय गायकवाड, अशोकचे संचालक शिवाजीराव शिंदे, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोकणे, शिवसेनेचे जिल्हा संघटक दादासाहेब कोकणे, निसर्ग व पर्यावरण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष संतोष परदेशी, ह.भ.प. दत्तात्रय बहिरट महाराज, ह.भ.प. राधेश्याम पांडागळे महाराज, श्रीरामपूरचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी दीपक त्रिभुवन, माजी प्राचार्य जयकर मगर, ह.भ.प. रवींद्र महाराज मुठे, कुलकर्णी महाराज, दर्यापूरकर महाराज आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
निसर्गाचे संवर्धन करा : माणिक महाराज मोरे
अध्यक्षीय भाषणात ह.भ.प. माणिक महाराज मोरे यांनी निसर्ग संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. “माणसाने निसर्गाची हानी करू नये. निसर्ग अबाधित राहिला तरच आपण टिकू,” असे त्यांनी सांगितले.
मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे माणसांमधील नातेसंबंध आणि मित्रपरिवारातील संवाद कमी होत असल्याची खंत व्यक्त करत पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईल वापराबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर हा त्याग आणि बलिदानाचा जिल्हा असून छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य सदैव प्रेरणादायी आहे. तसेच अहमदनगर जिल्हा हा संतभूमी म्हणून ओळखला जात असल्याचेही माणिक महाराज मोरे यांनी नमूद केले.
२५० सेवार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी केले. यावेळी प्रा. संतोष परदेशी, भारत भवार आणि प्राचार्य जयकर मगर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांच्या हस्ते आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात सेवा करणाऱ्या तब्बल २५० सेवार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये विविध गावांतील ह.भ.प., प्रवचनकार, कीर्तनकार, भजनी मंडळातील महिला-पुरुष तसेच धार्मिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
प्रमाणपत्र वितरणानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, कला-सांस्कृतिक, उत्कृष्ट शासकीय सेवा, कृषी भूषण, आदर्श पशुपालक, आदर्श माता-पिता, आदर्श सरपंच, आदर्श उपसरपंच, स्वच्छ व सुंदर शाळा, उत्कृष्ट महाविद्यालय यांसह विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला.
या पुरस्कारांमुळे ग्रामीण भागातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन मिळणार असून त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थितीकार्यक्रमाला तालुक्यातील आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील ह.भ.प., प्रवचनकार, कीर्तनकार, विविध गावांतील भजनी मंडळे, महिला-पुरुष तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूसाहेब तनपुरे व संगीता ताई फासाटे यांनी केले. उपस्थितांचे आभार संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत, उपाध्यक्ष संदीप पटारे, सुदाम पटारे, मुकुंद हापसे, अक्षय कोकणे, भैया पठाण, सुरज गलांडे, सुजित बोडखे, पत्रकार रवींद्र पवार, प्रा. विनीत भोसले, संजय पवार, सुरेश गलांडे सर आदींनी विशेष परिश्रम घेतले.कर्मवीर भाऊराव पाटील १३९ वी जयंती टाकळीभान विद्यालय
शिव वार्ता प्रतिनिधी ! बापूसाहेब नवले













