NM भरतीसाठी मोठा दिलासा! पात्रता गुणांची मर्यादा 45 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत शिथिल
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील आरोग्य सेविका (aim) पदभरतीसाठी आवश्यक असलेली किमान पात्रता गुणांची मर्यादा 45 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत कमी करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 30 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक ग्रामीण आणि दुर्गम भागात आरोग्य सेविकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने आरोग्य सेवा प्रभावित होत होती. विशेषतः माता-बाल आरोग्य, लसीकरण, गर्भवती महिलांची तपासणी, नवजात बालकांची देखभाल आणि प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यात aim कर्मचाऱ्यांना भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने पात्रता निकष शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम याद्या 8 ऑगस्टपर्यंत आदेश
शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड संवर्गातील नामनिर्देशन कोट्यातील aim पदभरतीसाठी 45 टक्के पात्रता गुणांची अट कमी करून 35 टक्के करण्यात आली आहे. मात्र, 4 मे 2022 रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयातील इतर सर्व अटी व तरतुदी पूर्ववत कायम राहणार आहेत.
शासनाने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय मुख्यमंत्री यांच्या मंजुरीनंतर जारी करण्यात आला असून, राज्यातील रिक्त पदे जलदगतीने भरून ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यास यामुळे मदत होणार आहे. रत्नागिरीच्या सड्यांवर खुलला रानफुलांचा रंगोत्सव
या निर्णयाचा होणारा फायदा
aim पदासाठी अधिक उमेदवार पात्र ठरणार.
ग्रामीण व दुर्गम भागातील रिक्त पदे भरून काढण्यास गती मिळणार.माता व बाल आरोग्य सेवा अधिक प्रभावी होणार.
प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांवरील मनुष्यबळाची कमतरता कमी होण्यास मदत होणार.
आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होण्याची शक्यता.
हा निर्णय राज्यातील हजारो aim पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठा दिलासा मानला जात असून, आगामी भरती प्रक्रियेत याचा थेट लाभ होणार आहे.













