देशसेवेतून सेवानिवृत्तीनंतर टाकळीभानमध्ये पुनरागमन; मेजर ज्ञानेश्वर माळी यांचे मित्रांकडून जंगी स्वागत
शिव वार्ता प्रतिनिधी ! बापूसाहेब नवले
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा भारतीय सैन्यात तब्बल २१ वर्षे देशसेवा बजावून नुकतेच सेवानिवृत्त झालेले मेजर ज्ञानेश्वर माळी यांचे टाकळीभान येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या १९९८ च्या दहावीच्या वर्गमित्रांनी जंगी स्वागत करण्यात आले
मेजर माळी यांनी रयत शिक्षण संस्थेच्या अहिल्याबाई होळकर वस्तीगृहात राहून टाकळीभान येथे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९९८ मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी गावी गेले आणि त्यानंतर भारतीय सैन्यात दाखल होऊन देशसेवेचा संकल्प पूर्ण केला. तब्बल २१ वर्षांची यशस्वी लष्करी सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्यानंतर सुमारे २८ वर्षांनी ते आपल्या शालेय मित्रांना भेटले.
या पुनर्भेटीचा आनंद मेजर माळी तसेच त्यांच्या मित्रांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. स्वागत समारंभाला मेजर माळी यांच्यासोबत त्यांचे आई-वडील, पत्नी, मुले व बहीणही उपस्थित होते. मित्रांचे निखळ प्रेम आणि आपुलकी पाहून मेजर माळी यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांनाही भावना अनावर झाल्या. दुर्मिळ वनस्पतींनी नटला निसर्ग
या सत्कारप्रसंगी बापूसाहेब नवले यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मेजर माळी यांच्या देशसेवेचा गौरव केला. मुलासह आई-वडिलांचाही सन्मान करण्यात आल्याने मेजर माळी यांनी सर्व मित्रपरिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त करत, “इतक्या वर्षांनंतरही मित्रांचे प्रेम आणि जिव्हाळा तसाच कायम असल्याचे पाहून मन भरून आले,”अशी भावना व्यक्त केली.
यावेळी उपसरपंच कानोबा खंडागळे, विजय त्रिभुवन, नितीन बनकर, भाऊसाहेब पवार, उमेश त्रिभुवन, श्रीकृष्ण वेताळ, पंकज पटारे , दत्तात्रय बोरगे, धनंजय पवार, गणेश कोकणे, एकनाथ पठारे, बापूसाहेब नवले, वस्तीगृह अधीक्षक तसेच १९९८ च्या बॅचमधील अनेक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशसेवेचा गौरव करणाऱ्या या आगळ्यावेगळ्या स्वागत समारंभामुळे टाकळीभानमध्ये भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.













