Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

न्यू इंग्लिश स्कूल स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश

न्यू इंग्लिश स्कूल, मुठेवाडगावच्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप परीक्षेतील यश

न्यू इंग्लिश स्कूल मुठेवाडगावच्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश

टाकळीभान प्रतिनिधी : बापूसाहेब नवले

बेलापूर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, मुठेवाडगाव येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या परीक्षेत अक्षदा सुनील तरकसे हिने ३०० पैकी २१४ गुण मिळवून सर्वाधिक यश संपादन केले. तसेच अर्णवी दिनकर मुठे हिने २०६ गुण, तर कृष्णा दत्तात्रय चौधरी याने १७८ गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या प्रोत्साहनाच्या बळावर हे यश मिळविल्याचे सांगितले. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी सातत्याने विशेष मार्गदर्शन, सराव परीक्षा आणि अभ्यासाचे नियोजन करून त्यांना सक्षम बनविले. त्याचेच फलित या यशातून दिसून आले आहे.मुठेवाडगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक काशीद, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक सिकची, उपाध्यक्ष संजय मुठे, सर्व समिती सदस्य तसेच शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यापुढील स्पर्धा परीक्षांमध्येही विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे यश संपादन करून विद्यालयाचे व परिसराचे नाव उज्ज्वल करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे न्यू इंग्लिश स्कूल, मुठेवाडगावच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणखी एकदा प्रचिती आली असून, आगामी काळातही शैक्षणिक क्षेत्रात अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचा निर्धार विद्यालयाने व्यक्त केला.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira