Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

NHM कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन सुरू

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाची प्रक्रिया

१० वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाला वेग; राज्यभर प्रक्रिया सुरू

मुंबई | प्रतिनिधी

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाची प्रक्रिया राज्य शासनाने अधिकृतपणे सुरू केली आहे. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र यांनी २३ जुलै २०२६ रोजी सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि संबंधित नियुक्ती प्राधिकरणांना याबाबत सविस्तर निर्देश जारी केले आहेत.  
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून सेवा समायोजनाची प्रक्रिया राज्यभर एकसमान, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत 
समायोजन प्रक्रिया कशी होणार? अधिसंख्य पदांचा प्रस्ताव महिन्यात सादर
शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक नियुक्ती प्राधिकरणाने पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करून ती प्रसिद्ध करायची आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून हरकती स्वीकारून त्यांचे निराकरण केले जाईल. अंतिम पात्रता यादी जाहीर झाल्यानंतर संबंधित माहिती राज्य कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.  
महत्त्वाचे वेळापत्रक
२४ जुलै २०२६ पर्यंत पात्र कर्मचाऱ्यांची यादी राज्यस्तरावर सादर करणे.
२७ जुलै २०२६ रोजी अंतरिम पात्रता यादी प्रसिद्ध करणे.
३१ जुलै २०२६ पर्यंत हरकती स्वीकारणे.
७ ऑगस्ट २०२६ पर्यंत हरकतींचे निराकरण करून अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध करणे.
८ ऑगस्ट २०२६ पर्यंत अंतिम यादी राज्य कार्यालयाकडे सादर करणे.  
प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आदेश नर्सिंग भरती नियमावर फेरविचाराची मागणी
शासनाने या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष समायोजन कार्यपथक नियुक्त केले आहे. तसेच दररोजच्या कामकाजाचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
shivvarta-jahira
कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
दीर्घकाळापासून सेवा समायोजनाच्या प्रतीक्षेत असलेल्या NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या निश्चित कालबद्ध कार्यक्रमानुसार प्रक्रिया पूर्ण झाल्यास राज्यातील हजारो पात्र कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira