Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

राज्यस्तरीय कबड्डी पुरस्काराने प्राचार्य सोपानराव काळे यांचा गौरव

राज्याचे उद्योग विकास मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्यस्तरीय कबड्डी पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य सोपानराव काळे.
राज्याचे उद्योग विकास मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्यस्तरीय कबड्डी पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य सोपानराव काळे.
राज्याचे उद्योग विकास मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्यस्तरीय कबड्डी पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य सोपानराव काळे.

राज्यस्तरीय कबड्डी पुरस्काराने प्राचार्य सोपानराव काळे यांचा गौरव

टाकळीभान | प्रतिनिधी

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त तसेच २६ व्या कबड्डी दिनानिमित्त रत्नागिरी येथे आयोजित राज्यस्तरीय कबड्डी पुरस्कार वितरण सोहळ्यात कबड्डी आणि शालेय क्रीडा क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय योगदान देणारे प्राचार्य सोपानराव काळे यांना प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय कबड्डी पुरस्काराने गौरविण्यात आले.

हा मानाचा पुरस्कार राज्याचे उद्योग विकास मंत्री मा. उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे श्रीरामपूर तालुक्यासह टाकळीभान परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्राचार्य सोपानराव काळे यांनी गेल्या तीन दशकांपासून कबड्डी तसेच शालेय क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून त्यांनी कबड्डीची आवड जोपासली. सन १९९५ मध्ये तेलकुडगाव येथे कबड्डी संघाची स्थापना करून ग्रामीण भागात कबड्डी खेळाची भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर शारीरिक शिक्षण विषयात बी.पी.एड. पदवी प्राप्त करून शिक्षक म्हणून कार्य करताना विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम निर्माण केले.   घाडगे पाटील यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात क्रीडा शिक्षक आणि पुढे प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी संस्थेत उत्कृष्ट क्रीडा संस्कृती विकसित केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी प्रो-कबड्डी, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले. कबड्डीबरोबरच खो-खो, कुस्ती, धावणे आदी विविध क्रीडा प्रकारांमध्येही त्यांनी अनेक गुणवंत खेळाडू घडविले आहेत.

कबड्डी क्षेत्रातील त्यांचे दीर्घकालीन योगदान, खेळाडू घडविण्याची तळमळ आणि ग्रामीण भागात खेळाचा प्रसार करण्यासाठी केलेल्या अथक कार्याची दखल घेत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनने त्यांना हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केला.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira