Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

पंकज आढाव यांचा क्रीडा दिनानिमित्त भव्य गौरव | छत्रपती संभाजीनगर

भारतीय क्रीडा दिनानिमित्त पंकज बापूसाहेब आढाव यांचा गौरव सोहळा

पंकज बापूसाहेब आढाव यांचा क्रीडा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य गौरव

शिव वार्ता क्रीडा प्रतिनिधी : भाऊसाहेब गव्हाणे

भारतीय क्रीडा दिनानिमित्त NSG कमांडो व आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथलीट्स पंकज बापूसाहेब आढाव यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने आज भव्य सत्कार व गौरव सोहळा उत्साहात पार पडला

गोळाफेक या क्रीडा पत्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पंकज आढाव यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला. देशसेवेची जबाबदारी सांभाळतानाच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

भारतीय क्रीडा दिनानिमित्त पंकज बापूसाहेब आढाव यांचा गौरव सोहळा

भानुदास चव्हाण सभागृह, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजजवळ, रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पंकज आढाव हे आगामी पॅरालिम्पिक 2028 स्पर्धेच्या तयारीत असून, लॉस एंजेलिस, अमेरिका येथे होणाऱ्या या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते मेहनत घेत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी पदक मिळविण्याचे त्यांचे ध्येय असून, त्यांच्या या क्रीडा प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी हा गौरव करण्यात आला.

NSG कमांडो म्हणून देशसेवा आणि आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथलीट्स म्हणून क्रीडा क्षेत्रातील कामगिरी अशी दुहेरी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या पंकज आढाव यांच्या गौरवामुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

क्रीडा दिनी दीपक भोसले यांना भाऊसाहेब गव्हाणेंची मदत

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!