Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजनेअंतर्गत धनादेश

nagebaba

टाकळीभान शाखेत आर्थिक मदतीचे वितरण • अपघातग्रस्त सभासदाला योजनेचा लाभ

टाकळीभान प्रतिनिधी :- श्री संत नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आर्थिक सेवांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या ‘नागेबाबा सभासद सुरक्षा कवच’ योजनेअंतर्गत टाकळीभान शाखेच्या सभासदास ₹1,03,840 रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था वर्षाचे ३६५ दिवस ग्राहकांना सेवा देत असून केवळ आर्थिक व्यवहारापुरते कार्य मर्यादित न ठेवता धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक तसेच आरोग्य क्षेत्रातही विविध उपक्रम राबवत आहे. संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपल्या कुटुंबाचा घटक असल्याची भावना जपत सभासदांच्या सुरक्षिततेसाठी ‘नागेबाबा सभासद सुरक्षा कवच’ ही योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत वार्षिक नाममात्र शुल्क भरून सभासदांना अपघाती संरक्षणाचा लाभ दिला जातो. अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत, तर अपघातामुळे उपचारासाठी ५ लाख रुपयांपर्यंत रुग्णालयीन खर्च देण्याची तरतूद आहे. संकटाच्या काळात सभासदांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्था या योजनेद्वारे करत आहे.

टाकळीभान शाखेचे खातेदार सभासद भाऊसाहेब सूर्यभान मुंजाळ यांचा काही दिवसांपूर्वी रस्ते अपघात झाला होता. त्यांनी सुरक्षा कवच योजनेत नोंदणी केली असल्याने त्यांना उपचारासाठी ₹1,03,840 रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश नागेबाबा मल्टिस्टेटच्या वतीने प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास कमलपूरचे माजी सरपंच सचिन मुरकुटे, सोसायटीचे चेअरमन दिगंबर बारस्कर, सोनार संघटनेचे अध्यक्ष मधुकर मैड, रमेश कोकणे, कुणाल कोकणे, रवींद्र शिंदे, भाऊसाहेब गोडे, बाबासाहेब मुरकुटे, राजेंद्र साप्ते, कानिफनाथ जाधव, सागर जेवरे, अक्षय खाडे, अर्जुन दवंगे, सागर कांगणे, महेश कांगणे, किरण वालतुरे, विलास मुंजाळ, रायभान मुंजाळ, संतोष मुंजाळ, गणेश मुंजाळ, बंडू मुंजाळ, सूर्यभान मुंजाळ, कमलपूर व परिसरातील ग्रामस्थ तसेच नागेबाबा संस्थेचे एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर एकनाथ नांदे, शाखाधिकारी रविंद्र व्यवहारे, शुभम मुंढे, रामेश्वर काळे आणि शाखेतील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira