वादळी ग्रामसभेत प्रश्नांचा भडीमार; महिला ग्रामसेविका अचानक बेशुद्ध
शिव वार्ता प्रतिनिधी : दिलीप लोखंडे
जामखेड तालुक्यातील देवदैठण येथे ग्रामसभा सुरू असताना प्रश्नांचा भडीमार होत असतानाच महिला ग्रामसेविका अचानक बेशुद्ध पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ग्रामसभेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामसभेदरम्यान विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना संबंधित महिला ग्रामसेविकेची प्रकृती अचानक बिघडली आणि त्या जागेवरच बेशुद्ध पडल्या. उपस्थित महिला व ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, जळगाव येथील ग्रामसेवकाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच देवदैठण ग्रामसभेतील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, महिला ग्रामसेविका नेमक्या कोणत्या कारणामुळे बेशुद्ध पडल्या, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेबाबत प्रशासनाकडूनही कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
या घटनेमागील नेमके कारण काय? ग्रामसभेतील प्रश्नांचा ताण होता की अन्य काही कारण? याबाबत प्रशासनाच्या अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.













