Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे भव्य स्वागत

टाकळीभानमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे जल्लोषात स्वागत!

टाकळीभानमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे जल्लोषात स्वागत!

टाकळीभान प्रतिनिधी :- अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले  रिपब्लिकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे टाकळीभान येथे रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आबासाहेब रणनवरे यांच्या हस्ते त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय, समता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत केंद्र शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील दीन-दलित, वंचित तसेच सामान्य जनतेच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठीच हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.टाकळीभान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी अधिकृत जागा उपलब्ध असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठवावा. शासन नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही त्या परिसरात उभारण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.बसस्थानक परिसरात उभारण्यात आलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आकर्षक ‘आय लव्ह’ डिजिटल लाइटिंग पाहून मंत्री रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त करत ग्रामस्थांच्या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री अविनाश महातेकर,राष्ट्रीय सरचिटणीस काकासाहेब खंबाळकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, विजयराव वाकचौरे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आबासाहेब रणनवरे, सुनील भोसले,आपासाहेब रणवरे,राजेंद्र रणनवरे,प्रा. कार्लस साठे,ॲड.संदीप शिंगारे,माजी मुख्याध्यापक अरुण बनसोडे,तसेच रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी केंद्रीय मंत्र्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

 

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira