Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

टाकळीभान येथील अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमातील मान्यवर

टाकळीभान येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

शिव वार्ता प्रतिनिधी!बापूसाहेब नवले

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील अण्णाभाऊ साठे चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिलेल्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजाने आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोकणे पाटील,उपसरपंच संतोष खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील भाऊ बोडखे,भाऊसाहेब पवार,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आबासाहेब रणनवरे, सोमनाथ शिंदे,दिलीप लोखंडे, विजय साळवे, अमोल अवसरमोल,नारायण काळे, भाऊसाहेब गव्हाणे, मेजर विनोद रणनवरे, तनवीर शेख, शंकर बोरुडे, सुभाष भाऊ बोरुडे, राजू भाऊ साळवे, सागर बोरुडे, आबासाहेब बोरुडे, अजित साळवे, संदीप साळवे, बाळासाहेब साळवे, अक्षय बोरुडे, किरण बोरुडे, गणेश बोरुडे, निखिल बोरुडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.[महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा महत्त्वपूर्ण निर्णय]

यावेळी उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि मानवतावादी विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira