कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विविध कार्यक्रम
सोमवार, २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता जयंती सोहळ्याचे आयोजन; मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
टाकळीभान | शिव वार्ता प्रतिनिधी
टाकळीभान, ता. श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जयंती सोहळा संपन्न होणार आहे.
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारातून प्रेरणा घेत रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. याच विचारांचा जागर करण्यासाठी टाकळीभान येथील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी टाकळीभानचे चे माजी चेअरमन श्री.मंजाबापू थोरात असणार आहेत.
तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री.सचिन दिलीपराव पवार उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.मधुकर अंबादास दाभाडे,सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणारे,रायगड,उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय मा.श्री.विजय सोपानराव घुले (माजी विद्यार्थी व उद्योगपती, पुणे)आणि श्रीमती.स्वाती तान्हाजी पटारे (आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त, जि.प.प्राथमिक शाळा,अशोकनगर) यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी श्री.अविनाश शामराव चव्हाण (एक्झि.इंजी कोयना डॅम) आणि श्री.देविदास लहू रणनवरे यांचे सहकार्य लाभणार आहे.
तसेच विद्यालयातील स्कूल कमिटी,सल्लागार समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती,पालक शिक्षक संघ,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ तसेच पत्रकार बांधवांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक विचारांचा आणि स्वावलंबी शिक्षणाच्या संदेशाचा जागर करणारा हा जयंती सोहळा उत्साहात पार पडणार असून विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय,टाकळीभान यांच्या वतीने करण्यात आले आहे.निल देठे व साईराज वाडकर यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड













