Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

निल देठे व साईराज वाडकर यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

निल देठे व साईराज वाडकर यांचे उत्कृष्ट प्रदर्शन; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

♟️ तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत डीडी काचोळे विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड

निल देठे व साईराज वाडकर यांचे उत्कृष्ट प्रदर्शन; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

श्रीरामपूर | शिव वार्ता प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व श्रीरामपूर क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, श्रीरामपूर येथे उत्साहात पार पडल्या.

रामपूर बुद्धिबळ स्पर्धेत डीडी काचोळे विद्यालयाच्या 2 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड
श्रीरामपूर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत डीडी काचोळे विद्यालयाच्या निल देठे व साईराज वाडकर यांची उत्कृष्ट कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.

या स्पर्धेत डीडी काचोळे माध्यमिक विद्यालयातील चिरंजीव निल देठे (वय १४ वर्षे) तसेच चिरंजीव साईराज वाडकर (वय १७ वर्षे) यांनी बुद्धिबळाच्या पटावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उल्लेखनीय कामगिरी केली.

दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या खेळातील कौशल्य, संयम, डावपेचांची अचूकता आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील साळवे सर, पर्यवेक्षक श्री. सूर्यकांत सराटे सर, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, गुरुकुल प्रमुख श्री. रविंद्र निकम,अजित कदम,वसतिगृह अधीक्षक श्री. भराड सर, मार्गदर्शक श्री. सुनील खाडे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बुद्धिबळासारख्या बौद्धिक खेळातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, निर्णयक्षमता, संयम आणि रणनीती विकसित होत असल्याने अशा स्पर्धांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष महत्त्व आहेजय बजरंग मंडळाचा गणेशोत्सव; १९८० पासूनची परंपरा कायम

-शिव वार्ता बापूसाहेब नवले

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!