हरेगावच्या मत माउली यात्रेनिमित्त अजितदादा काळे यांची सदिच्छा भेट
ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार; शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
शिव वार्ता क्रीडा प्रतिनिधी
हरेगाव येथे सुरू असलेल्या मत माउली यात्रेनिमित्त शेतकरी लोकनेते तथा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजितदादा काळे यांनी सदिच्छा भेट देत मत माउलीचे दर्शन घेतले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ, सरपंच, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच युवा शेतकरी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उंदीरगावचे सरपंच गोलवड तसेच हरेगावचे सरपंच त्रिभुवन यांच्या उपस्थितीत उंदीरगाव व हरेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने वीरेश गलांडे यांच्या हस्ते शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजितदादा काळे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते व प्रभारी कार्लस साठे सर, युवा शेतकरी नेते सचिन भाऊ वेताळ, बाबासाहेब वेताळ, प्रगतिशील शेतकरी शिवाजी राजे पटारे, सोपानराव नाईक, बापूसाहेब गोरे पाटील, प्रभाकर कांबळे तसेच टाकळीभान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुजित भाऊ बोडखे, अरविंद साळवे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
मत माउली यात्रेनिमित्त हरेगाव परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांसह शेतकरी व ग्रामस्थांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. अजितदादा काळे यांच्या भेटीमुळे शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी उपस्थितांनी “जय जवान, जय किसान, जय शेतकरी संघटना” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.मत मावली यात्रेसाठी पायी जाणाऱ्या भाविकांची सेवा













