Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

टाकळीभान मध्ये दिनार कुदळे यांचा सत्कार; ऊस उत्पादकांना सहकार्याचे आश्वासन

टाकळीभान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतर्फे कुदळे, चव्हाण, मांजरे यांचा सत्कार

शिव वार्ता प्रतिनिधी ! बापूसाहेब नवले

टाकळीभान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे नवनियुक्त व्हाईस चेअरमन श्री. दिनार कुदळे तसेच संचालक श्री. शंकरराव चव्हाण व श्री. सुनील मांजरे यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. दिनार कुदळे यांनी आगामी ऊस गळीत हंगामाबाबत शेतकऱ्यांना आश्वासन दिले. टाकळीभान व पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याच्या वतीने योग्य ते सहकार्य करण्यात येईल. ऊसाची वेळेवर तोडणी करण्याबरोबरच ऊसाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री. मंजाबापू थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन श्री. राहुल पटारे, माजी चेअरमन श्री. मधुकर कोकणे, संचालक श्री. विजय कोकणे, श्री. अविनाश लोखंडे, श्री. एकनाथ पटारे, श्री.देवदान रणनवरे, श्री. दिलीप पवार, श्री.शिवाजीराव धुमाळ, श्री.सुधीर मगर,श्री.भाऊसाहेब पवार, श्री.जयकर मगर, श्री.काकासाहेब कोकणे, श्री.अजित थोरात, श्री. दीपक डुकरे, श्री.बाळासाहेब शेळके, श्री. राजेंद्र देवळालकर, श्री.भैय्यासाहेब पठाण, श्री. रमेश कोकणे, श्री. सुरेश पटारे, श्री. सुरेश मुळे, श्री. अक्षय कोकणे, श्री. नंदू रणनवरे, श्री. राधाकिसन इंगळे, श्री. रविंद्र पटारे, श्री. संजय कदम, श्री. बंडोपंत बहिरट, सचिव रामनाथ ब्राम्हणे, श्री. रवी शिरसाठ, श्री. रघुनाथ शेळके, श्री. विठ्ठल बनकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या शेवटी उपसरपंच श्री. कान्होबा खंडागळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!