Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

क्रीडा दिनी दीपक भोसले यांना भाऊसाहेब गव्हाणेंची मदत

क्रीडा दिनानिमित्त दीपक भोसले यांना ट्रॅकसूट व स्पोर्ट्स शूज देताना भाऊसाहेब गव्हाणे

क्रीडा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय दिव्यांग धावपटू दीपक भोसले यांना भाऊसाहेब गव्हाणे यांची मदत

शिव वार्ता क्रीडा प्रतिनिधी

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा भारतीय क्रीडा दिन २९ ऑगस्ट रोजी देशभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. या क्रीडा दिनाचे औचित्य साधून विश्व धावपटू व प्रशिक्षक भाऊसाहेब गव्हाणे यांनी नाशिकचे राष्ट्रीय दिव्यांग धावपटू दीपक गणेश भोसले यांना ट्रॅकसूट, स्पोर्ट्स शूज आणि बदामाचे गिफ्ट देत मदतीचा हात दिला.

दीपक भोसले हे एका डोळ्याने दिव्यांग असूनही आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर विविध राष्ट्रीय स्तरावरील धावण्याच्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. बिहार, गुजरात, मध्य प्रदेश यांसह विविध राज्यांमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होत त्यांनी गोल्ड आणि सिल्व्हर मेडल्स पटकावले आहेत.

क्रीडा दिनानिमित्त दीपक भोसले यांना ट्रॅकसूट व स्पोर्ट्स शूज देताना भाऊसाहेब गव्हाणे
मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीपक भोसले यांचा गौरव करण्यात आला होता.

दीपक भोसले यांनी ५ किलोमीटर, १० किलोमीटर तसेच २१ किलोमीटर अशा विविध अंतरांच्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. खुल्या गटातील स्पर्धांमध्येही त्यांनी आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेही त्यांना सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले आहे.

आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही दीपक भोसले यांनी धावण्याची आवड आणि जिद्द कायम ठेवली आहे. त्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा मिळावी यासाठी विश्व धावपटू व प्रशिक्षक भाऊसाहेब गव्हाणे त्यांना मार्गदर्शन करत असून, उत्कृष्ट रनिंगचे प्रशिक्षण व आवश्यक मार्गदर्शन देत आहेत.

राहता येथे झालेल्या नामदार मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीपक भोसले यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब गव्हाणे यांनी आवश्यक क्रीडा साहित्य व पौष्टिक आहाराच्या स्वरूपात मदत केली.

दिव्यांगत्वावर मात करत राष्ट्रीय स्तरावर नाशिकचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दीपक भोसले यांना मिळालेली ही मदत त्यांच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार

अस्लम इनामदारची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!