Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

लेखी आश्वासनानंतर खिर्डी येथील पीडित कुटुंबाचे उपोषण मागे

: खिर्डी पीडित कुटुंबाचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे

लेखी आश्वासनानंतर खिर्डी येथील पीडित कुटुंबाचे उपोषण मागे

शिव वार्ता प्रतिनिधी : दिलीप लोखंडे

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी खिर्डी येथील पीडित कुटुंबाने सुरू केलेले उपोषण अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतल

भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ३३३, ११८(१), ११५(२), ३५२, ३५२(२)(३), १८९(२), १९१(२)(३), १९० तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ मधील कलम ३(१)(w)(i), ३(१)(r)(s) व ३(२)(v-a) अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली होती.

या मागणीसाठी पीडित कुटुंब १५ ऑगस्ट रोजी श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारतीसमोरील संत तेरेजा चौकात कुटुंबीयांसह उपोषणास बसले होते. शनिवार, २२ ऑगस्ट रोजी पोलिसांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार, संबंधित गुन्ह्यात राहुल विठ्ठल धायगुडे (वय ३६) याला १७ जुलै २०२६ रोजी रात्री ११.११ वाजता अटक करण्यात आली आहे. तसेच पंकज विठ्ठल धायगुडे, विशाल भगवान म्हसाळ, जालू ऊर्फ जालिंदर सोमनाथ देवकाते, बाबासाहेब ऊर्फ बाबू भाऊसाहेब हाळनोर आणि जनार्दन ऊर्फ जना बाबादी विटनोर (सर्व रा. खिर्डी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांचा शोध घेऊन ते मिळून आल्यास त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले.

तसेच उपोषण मागे घेऊन पोलीस तपासात सहकार्य करण्याचे आवाहनही पोलिसांकडून पीडित कुटुंबाला करण्यात आले आहे.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुकाध्यक्ष पोपटराव सरोदे, श्रीरामपूर लहुजी शक्ती सेनेचे प्रवीण वैरागर, विजय शेलार, आकाश अडंगळे, अर्जुन दोडके, विशाल शिरसाठ, अमोल मिसाळ, ज्ञानेश्वर जगधने, कांतिलाल जगधने, रवि शेलार, सीताराम शिरसाठ आदी उपस्थित होते.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!