Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

कर्जमुक्ती योजनेतून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या

कर्जमुक्ती योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी भोकरच्या सरपंच शीतल पटारे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

कर्जमुक्ती योजनेतून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या; पालकमंत्र्यांकडे सरपंच शीतल पटारे यांचे निवेदन

शिव वार्ता प्रतिनिधी ! हरिभाऊ बिडवे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा, अशी मागणी भोकर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच शीतल पटारे यांनी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात शेतकऱ्यांकडून कर्जमाफीच्या कालावधीतील तफावतीमुळे निर्माण झालेल्या अडचणींकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.राज्यातील धरणसाठा समाधानकारक

दोन कर्जमुक्ती योजनांच्या निकषांमध्ये अनेक शेतकरी अडकले

यापूर्वीच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ३० जून २०१९ पर्यंत थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला होता. त्यानंतरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी १ एप्रिल २०१९ ते ३० जून २०२५ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

मात्र, साखर कारखान्यांचा गळीत हंगाम साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होतो. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले पीककर्ज या दोन्ही कर्जमुक्ती योजनांच्या निर्धारित कालावधीत बसत नाही.

परिणामी, या कालावधीत पीककर्ज घेतलेले अनेक शेतकरी दोन्ही योजनांच्या लाभापासून वंचित राहिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पीक लागवडीच्या तारखेपासून कालावधी निश्चित करण्याची मागणी

पीक लागवडीच्या तारखेपासून कालावधी निश्चित करण्याच्या मागणी

शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन कर्जमुक्ती योजनेचा कालावधी पीक लागवडीच्या तारखेपासून, म्हणजेच १ एप्रिल २०१८ पासून विचारात घेण्यात यावा, अशी मागणी सरपंच शीतल पटारे यांनी केली आहे.

शासनाने विद्यमान निकषांमध्ये आवश्यक सुधारणा करून या कालावधीत पीककर्ज घेतलेल्या व सध्या कर्जमुक्तीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ द्यावा. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना दिलासा मिळून त्यांना न्याय मिळू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे.

शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

वंचित शेतकऱ्यांकडून प्रश्नाचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांची हिताचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सरपंच शीतल पटारे यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी वेळी भोकरच्या सरपंच शीतल पटारे, प्रताप पटारे तसेच सोसायटीचे माजी चेअरमन राहुल अभंग उपस्थित होते.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!