उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी घेतली सदिच्छा भेट
शिव वार्ता प्रतिनिधी : बापूसाहेब नवले
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या अहिल्यानगर दौऱ्यानिमित्त शासकीय विश्रामगृह येथे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान विविध विकासकामे, स्थानिक प्रश्न तसेच जनहिताच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचीही मुरकुटे यांनी सदिच्छा भेट घेतली. दोन्ही मान्यवरांशी विविध विषयांवर सविस्तर संवाद साधण्यात आला.

या प्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग, अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक नीरज (भैय्या) मुरकुटे, माजी संचालक बबन मुठे, अशोक सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब हळनोर, संचालक निवृत्ती थोरात यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या अहिल्यानगर दौऱ्यादरम्यान झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे स्थानिक पातळीवरील विकासकामे आणि विविध प्रश्नांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. नीरज भैय्या मुरकुटे उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत












