Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

टाकळीभान मध्ये प्राईड अकॅडमीची भव्य आषाढी वृक्षदिंडी;

टाकळीभानमध्ये प्राईड अकॅडमीची भव्य आषाढी वृक्षदिंडी; भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम

प्रतिनिधी | टाकळीभान

आषाढी एकादशीचे औचित्य साधत माऊली प्रतिष्ठान संचलित प्राईड अकॅडमी, टाकळीभान यांच्या वतीने भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी भव्य आषाढी वृक्षदिंडी उत्साहात काढण्यात आली. पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागामुळे संपूर्ण टाकळीभान गाव भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले.

टाकळीभान येथे प्राईड अकॅडमीची आषाढी वृक्षदिंडी काढताना विद्यार्थी आणि वारकरी
प्राईड अकॅडमी, टाकळीभानच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त काढलेल्या भव्य वृक्षदिंडीचा देखावा.

माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर माऊली मुरकुटे यांच्या प्रेरणेने आणि प्राईड अकॅडमीच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. दिंडीची सुरुवात टाकळीभान येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे प्रस्थान करून करण्यात आली.

गावातील विविध ठिकाणी ग्रामस्थांनी कमानी उभारून, पुष्पवृष्टी करत तसेच टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडीचे जल्लोषात स्वागत केले. विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी आणि तुळशीच्या पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात निघालेल्या या दिंडीत वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.नाऊर दिंडी सोहळा | जि.प. शाळेचा भक्तिमय उपक्रम

यावेळी विद्यार्थ्यांनी संत गोरोबा काका यांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोग, विठ्ठल भक्तीवरील नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सादरीकरणांना पालक, ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त दाद दिली.टाकळीभान चा चतुर्भुज विठ्ठल

डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, वारकरी संप्रदाय, पर्यावरण संवर्धन आणि संस्कारमूल्यांचे महत्त्व सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, निसर्गप्रेम, सांस्कृतिक वारशाचा अभिमान आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दिंडीच्या समारोपप्रसंगी श्री साईबाबा मंदिर, टाकळीभान येथे श्रीरामपूरचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष करण दादा ससाणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमास सरपंच अर्चनाताई रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडीतील विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था कान्हा खंडागळे आणि पृथ्वीराज उंद्रे यांनी केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राईड अकॅडमीच्या प्राचार्या अस्मिता देवरे, उपप्राचार्य प्रदीप गोराणे, मुख्याध्यापिका सौ. वाडेकर, सौ. मिरीकर, प्रीती गोटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी सर्वांचे आभार मानले.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira