Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

NHM जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू

NHM अंतर्गत 5 वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू

 NHM अंतर्गत ५ वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू 

 सातारा | प्रतिनिधी

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी  दि. 23 जुलै 2026  रोजी जारी केला आहे.

आदेशानुसार, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एकाच पदावर किंवा एकाच ठिकाणी सलग पाच वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेले अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरणार आहेत. संबंधितांची यादी तयार करण्यात आली असून, इच्छुकांनी 31 जुलै 2026  पर्यंत आपल्या बदलीसाठी लेखी अर्ज सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.  सेवामावेशना बाबत हालचालींना वेग

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, प्रशासकीय गरज तसेच कर्मचाऱ्यांच्या विनंतीचा विचार करून ऑगस्ट 2026  मध्ये जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात येणार आहेत. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आपल्या बदलीसंदर्भातील पर्याय विहित कालावधीत सादर करणे आवश्यक राहील.

या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, तालुका लेखापाल, कार्यक्रम सहाय्यक, एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अकाउंटंट कम डीईओ आदी पदांवरील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पात्र यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

महत्त्वाचे मुद्दे NHM कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन सुरू

आदेश दिनांक: 23 जुलै 2026
विभाग: राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), सातारा
बदलीचा प्रकार: जिल्हाअंतर्गत
पात्रता: एकाच पदावर/ठिकाणी 5 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 जुलै 2026
बदलीचा संभाव्य कालावधी: ऑगस्ट 2026

shivvarta-jahira
Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira