Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

श्रीरामपूरात जनआक्रोश हजारोंचा भव्य मोर्चा

श्रीरामपूरात आकाश दुबय्या हत्याकांडाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या भव्य न्याय मोर्चात हजारो नागरिक सहभागी होत मकोका कारवाईची मागणी करताना.

श्रीरामपूरात आकाश दुबय्या हत्याकांडाच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या भव्य न्याय मोर्चात हजारो नागरिक सहभागी होत मकोका कारवाईची मागणी करताना.

श्रीरामपूरात न्यायासाठी जनआक्रोश; हजारोंचा भव्य मोर्चा, आरोपींवर ‘मकोका’ कारवाईची जोरदार मागणी

श्रीरामपूर | शिव वार्ता प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात आज (१५ जुलै) आकाश दुबय्या हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात हजारो नागरिकांनी अभूतपूर्व न्याय मोर्चा काढला. व्यापारी, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने शहरातील प्रमुख मार्गांवर जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मोर्चेकऱ्यांनी आकाश दुबय्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका/MCOCA) लागू करण्याची मागणी केली. तसेच शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली
मोर्चादरम्यान आकाश दुबय्याला न्याय मिळालाच पाहिजे”, “गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे” अशा घोषणा देण्यात आल्या. अनेक व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी हा मोर्चा कोणत्याही एका व्यक्तीचा नसून संपूर्ण श्रीरामपूरच्या सुरक्षित भविष्यासाठी असल्याचे मत व्यक्त केले.

नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई, अवैध धंद्यांवर नियंत्रण, खंडणी आणि दहशतीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी केली. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रमुख मागण्या
आकाश दुबय्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई.
गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई.
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम.
शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना.

टीप: मोर्चा शांततेत पार पडला असून प्रशासनाकडून मागण्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मोर्चानंतर बंद मागे पण मेन आरोपींविरुद्ध मोक्का लागत नाही तोपर्यंत लढाई सुरु राहणार सर्वपक्षीय श्रीरामपूरकरांचा निर्धार.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira