
लोकनेते माजी आमदार भानुदासजी मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची सदिच्छा भेट
भोकर | प्रतिनिधी
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची लोकनेते माजी आमदार भानुदासजी मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली, ऋषी छल्लारे फाउंडेशनचे संस्थापक गणेश छल्लारे तसेच युवा नेते नीरज मुरकुटे यांच्या उपस्थितीत सदिच्छा भेट घेण्यात आली.
या भेटीदरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, सामाजिक प्रश्न आणि जनहिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले.
यावेळी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. विकासाभिमुख उपक्रमांना गती देण्यासाठी परस्पर सहकार्य वाढविण्याचा निर्धारही करण्यात आला.
बैठकीनंतर उपस्थित मान्यवरांच्या वतीने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सकारात्मक संवाद आणि सहकार्य कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.













