
टाकळीभान प्रतिनिधी :- शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष तथा श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष तथा श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार यांच्यासह मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
या प्रसंगी उपस्थितांनी स्वर्गीय जयंतराव ससाणे यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासाठी दिलेले योगदान, सर्वसामान्य जनतेशी जपलेले जिव्हाळ्याचे नाते आणि समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची आठवण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.













