
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिराच्या ग्रेनाईट कामाचा शुभारंभ उत्साहात
टाकळीभान प्रतिनिधी :- जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिराचे निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आले आहे.
हे काम गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज तसेच श्री क्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी ह.भ.प. स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे.
ग्रेनाईट कामाचा शुभारंभ
मंदिराच्या ग्रेनाईट कामाचा शुभारंभ ह.भ.प. संतोष महाराज चौधरी, ह.भ.प. कृष्णा महाराज वाघुले, ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व मौलाना अहमद शेख आणि प्रसिद्ध उद्योगपती अशपाकभाई शेख यांच्या शुभहस्ते झाला.
₹३.३५ लाखांचे ग्रेनाईट दान
मंदिरासाठी ग्रेनाईटची आवश्यकता असल्याची माहिती सेवेकरी मंडळींनी अशपाकभाई शेख यांना दिली. त्यानंतर त्यांनी तत्काळ संपूर्ण ग्रेनाईट देण्याचा शब्द दिला. यानुसार छत्रपती संभाजीनगर आणि नेवासा फाटा येथून सुमारे ₹३.३५ लाख किमतीचे ग्रेनाईट आणण्यात आले. आज त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
मान्यवरांचा सन्मान
यावेळी ह.भ.प. संतोष महाराज चौधरी, ह.भ.प. कृष्णा महाराज वाघुले आणि ह.भ.प. श्याम महाराज यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मौलाना अहमद शेख आणि अशपाकभाई शेख यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
अशपाकभाई शेख यांचे मनोगत
अशपाकभाई शेख म्हणाले, “टाकळीभान आणि ग्रामस्थांसाठी शक्य ते योगदान देत राहीन. सामाजिक व धार्मिक कार्याला माझा नेहमीच पाठिंबा राहील. शिवाय, तरुणांनी धर्मकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा.”













