Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

श्रीरामपूरमध्ये विशेष मतदार पडताळणीला शुभारंभ

श्रीरामपूरमध्ये विशेष मतदार पडताळणी मोहिमेचा शुभारंभ

श्रीरामपूरमध्ये विशेष मतदार पडताळणी मोहिमेचा शुभारंभ

श्रीरामपूर प्रतिनिधी:-राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार पडताळणी मोहिमेला श्रीरामपूर तालुक्यात उत्साहपूर्ण सुरुवात झाली.

मोहिमेच्या प्रारंभी श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण दादा ससाणे यांचे गणना पत्र प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी किरण सावंत पाटील यांनी भरून घेत मोहिमेचा शुभारंभ केला.
या प्रतीकात्मक उपक्रमातून मतदार पडताळणी मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी विशेष सखोल मतदार पडताळणी मोहिमेची उद्दिष्टे, प्रक्रिया आणि नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली.
मतदार यादी अधिक अचूक,अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करून बूथ लेव्हल अधिकाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे,असे नमूद केले.
नगराध्यक्ष करण दादा ससाणे यांनी मतदार पडताळणी ही लोकशाही अधिक सक्षम आणि बळकट करणारी प्रक्रिया असल्याचे सांगितले. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रशासनाला सहकार्य करून मतदार यादी अचूक करण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
या उपक्रमामुळे मतदार यादीतील त्रुटी दूर होऊन अधिक विश्वासार्ह आणि अद्ययावत मतदार यादी तयार होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira