टाकळीभानमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ
शिव वार्ता | प्रतिनिधी अशोक रणनवरे
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे एका ३२ वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या छपराला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या मिळालेल्या माहितीनुसार, जॉन प्रभाकर रणनवरे (वय ३२) हे टाकळीभान येथील गट क्रमांक १५ मधील आपल्या राहत्या घरी वास्तव्यास होते. शुक्रवारी दुपारी सुमारे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घरात कोणीही नसताना त्यांनी छपराला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेत जॉन रणनवरे यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ तसेच आई-वडील असा परिवार आहे.
या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश डवले करीत आहेत.












